नेतृत्व गुणांच्या शिदोरीवर ज्या यशवंतराव चव्हाण यांनी देशावर आपला वेगळा ठसा उमटवला त्यांच्या नावाने दिल्या जाणार्या पुरस्कारासाठी इस्रोची निवड करण्यात आली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच डॉ. माशेलकर यांच्या हस्ते हा सन्मान मिळावा यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती, असे कृतज्ञतापूर्ण उद्गार श्री. जी. माधवन् नायर यांनी काढले. आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले की, संशोधनाकरीता लागणारे पोषक वातावरण (ambiance) आणि शास्त्रज्ञांकडे असलेली महत्त्वाकांक्षा (ambition) दोन गुणांमुळे इस्रोला जागतिक पातळीवर महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
![]()
डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय कृषीमंत्री मा. श्री. शरद पवार यांच्या अनुपस्थितीत डॉ. माशेलकरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चांद्रयान मोहीम फत्ते करून अवघ्या जगात भारताची मान उंचावणार्या ‘इस्रो’ (Indian Space Research Organisation) या सुविख्यात संस्थेला या पुरस्काराने गौरवण्यात आले. इस्रोच्या वतीने इस्रोचे अध्यक्ष श्री. जी. माधवन् नायर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. चव्हाण केंद्राच्या मुख्य सभागृहात करण्यात आले. ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २००८’ चे वितरण गुरुवार, १२ मार्च रोजी यशवंतराव आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या ९६व्या जयंतीनिमित्ताने
|