|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. अरुणभाई गुजराथी, सरचिटणीस श्री. शरद काळे, कोषाध्यक्ष डॉ. रवींद्र बापट, विश्वस्त श्री. अजित निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अंबरीष मिश्र यांनी केले. श्री. शरद काळे यांनी मानपत्राचे वाचन केले, तर डॉ. रवींद्र बापट यांनी निवड समितीच्या अध्यक्षा श्रीमती (जस्टिस) सुजाता मनोहर यांचे मनोगत वाचून दाखवले. सत्कार सोहळ्यादरम्यान डॉ. माशेलकर यांनी ‘इंडियन स्पेस ओडीसी’ या जळगांव येथील रामकृष्ण सरस्वती गुरुकुल विद्यालयातील शिक्षक हेमंत जाधव यांच्या पुढाकाराने शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले १९८ पाणी पुस्तक श्री. नायर यांच्या सुपूर्द केले आणि या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. ‘चांद्रयान’ या प्रकल्पामुळे भारतीय तरुणामध्ये वृद्धिंगत झालेल्या आत्मविश्वासाची साक्ष म्हणजेच हे पुस्तक आहे. डॉ. माशेलकर यांनी आपल्या भाषणामध्ये इस्रोकडे असलेल्या ‘टॅलेण्ट, टेक्नॉलॉजी, टॉलरन्स ऑफ फेल्युअर’ या ‘टी’च्या त्रिसूत्रीचे महत्त्व विशद केले. अपयशामुळे खचून न जाता पुन्हा उभे राहत यश कसे मिळवावे याचा आदर्श इस्रोने ठेवला आहे. अंतराळ संशोधनातील जगातील पहिल्या तीन संस्थांमध्ये इस्रोचे स्थान आहे, असे गौरवोद्गार डॉ. माशेलकर यांनी काढले.
|