यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

       


     

                           

धुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या ९५ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २००७  चे वितरण यशवंतराव चव्हाण केंद्राच्या मुख्य

सभागृहात करण्यात आले. केंद्रीय कृषीमंत्री मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. श्रीमती सरोज पचौरी व डॉ. आर.के. पचौरी या दाम्पत्याला संयुक्तरित्या प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

ग्‍लोबल वॉर्मिंगच्‍या धोक्‍यापासून मानवी जीवनाचे रक्षण करायचे असेल तर नैसर्गिक स्‍त्रोतांचा योग्‍य वापर आणि जीवनशैलीत अमूलाग्र बदल या दोन गोष्‍टींचा अंगीकार करण्‍यावाचून पर्याय नसल्‍याचे मत नोबेल विजेते पर्यावरणशास्‍त्रज्ञ डॉ. आर.के. पचौरी यांनी व्‍यक्‍त केले.

महिलांचे आरोग्‍य आणि कुटुंबकल्‍याण क्षेत्रात कार्यरत असलेल्‍या डॉ. सरोज पचौरी यांनी आपल्या मनोगतात बाळंतपणात मृत्‍यूमुखी पडणार्‍या महिलांची सर्वाधिक संख्‍या भारतात असून नवजात अर्भकांच्‍या मृत्‍यूचे प्रमाणही लक्षणीय असल्‍याचे निदर्शनास आणून दिले.

या कार्यक्रमाला माजी सरन्यायाधीश वाय्.व्ही. चंद्रचूड, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अरुणभाई गुजराथी, सरचिटणीस शरद काळे, कोषाध्यक्ष डॉ. रवींद्र बापट आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अंबरीष मिश्र यांनी केले, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी मानपत्राचे वाचन केले. 

 


 

मुख्य पान