|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
संदर्भ ग्रंथालयाच्या धर्तीवर
यशवंतराव चव्हाण ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. आजमितीस ग्रंथालयात
१३,०००
मौल्यवान ग्रंथ असून
संगणकावर त्यांची नोंदणी
झालेली
आहे. वाचकांच्या सोयीसाठी
झेरॉक्स मशीनची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण ग्रंथालय हे सर्व वाचकांसाठी खुले आहे. सर्वसाधारण सभासदांची वार्षिक वर्गणी रु. २५०/- तर विद्यार्थी वर्गासाठी रु. २५/- आहे. प्रतिष्ठानने विविध क्षेत्रातील अभ्यासकांना, विचारवंतांना ग्रंथालयाचे आजीव सभासदत्व दिले आहे. त्यांना ग्रंथालय विनामूल्य उपलब्ध आहे. ग्रंथालयाचा सभासदत्वाचा अर्ज भरून कोणालाही सभासद होता येते. श्री. वा.रा.कामत ग्रंथालयाचे सल्लागार असून श्री. अनिल पाझारे ग्रंथपाल आहेत. श्री. अनिल चिंदरकर ग्रंथालयाच्या कार्यामध्ये सहाय्य करतात. सोमवार ते शनिवार ११.०० ते ६.०० या वेळात ग्रंथालय सभासदांना खुले असते. महिन्यातील दुसर्या व चौथ्या शनिवारी व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी ग्रंथालय बंद असते.
यशवंतराव चव्हाण ग्रंथालय
|