कार्यवृत्त
कार्यवृत्त


 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

ग्रंथालयामध्ये AACR-II (अँग्लो अमेरिकन कॅटलॉग रूल्स २) प्रमाणे, संगणकीय तालिकीकरण करण्यात आले आहे. तसेच DDC-21 (डयुई डेसिमल क्लासिफिकेशन) नुसार ग्रंथांचे वर्गीकरण केले असून DDCप्रमाणे (०००-९९९) मुख्य वर्गांक आणि त्यांचे उपवर्ग यानुसार ग्रंथांची मांडणी केलेली आहे. सर्व ग्रंथ याच पद्धतीप्रमाणे कपाटामध्ये ठेवण्यात आले असून OPACच्या मदतीने माहिती मिळवून पाहिजे असलेल्या ग्रंथाचा शोध अचूकपणे घेता येतो.
ग्रंथालयाचा वापर जास्तीत जास्त सुलभतेने व्हावा यासाठी ग्रंथालय सॉफ्टवेअरच्या मदतीने यशवंतराव चव्हाण ग्रंथालयाचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. ग्रंथालयामध्ये असलेली पुस्तके आणि नव्याने खरेदी करण्यात येणारी पुस्तके वाचकांना सहज उपलब्ध व्हावीत, याकरीता ग्रंथालयाने वाचकांच्या माहिती सेवेसाठी OPAC (Online Public Access Catalogue) सुरू केले आहे. यामध्ये, लेखक, सहलेखक, ग्रंथनाम, विषय, वर्ष, प्रकाशक, वर्गांक यांचा वापर करून OPACच्या मदतीने वाचकांना माहिती व ग्रंथाची सूची मिळविता येते.
सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाचे असलेले आणि संदर्भाकरीता उपयोग व्हावा या दृष्टीने यशवंतराव चव्हाण ग्रंथालयाने काही महत्त्वाच्या विषयासंबंधीची वृत्तपत्रीय कात्रणे काढून वाचकांना हाताळता यावीत याकरीता व्यवस्थित बांधणी करून ग्रंथालयामध्ये ठेवली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी, संशोधक यांच्याकरीता नियतकालिकांची बांधणी करून ती संदर्भाकरीता स्वतंत्र ठेवली आहेत.

 

 

यशवंतराव चव्हाण ग्रंथालय