यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

संयुक्त संस्था सभासदत्व (Corporate Membership)

संयुक्त संस्था सभासदत्व (Corporate Membership) कॉर्पोरेट या शब्दाच्या व्याख्येत बसणारी संस्था सभासदत्वासाठी पात्र असेल. एकावेळची वर्गणी रु. ५०,०००/- ५ वर्षांसाठी. सर्वसाधारणपणे अनामत रक्कम घेण्यात येणार नाही. परंतु एखाद्या दुर्मिळ व किंमती पुस्तकासाठी प्रतिष्ठान निश्चित करेल तेवढी अनामत रक्कम घेण्यात येईल. एकावेळी १० पुस्तके देण्यात येतील.

महाविद्यालयीन व उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी/संशोधक

महाविद्यालयीन व उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी/संशोधक यांच्याकरिता त्यांना सोय-सवलत म्हणून नाममात्र वर्गणी रु. २५०/- व अनामत रक्कम रु. १००/- घेण्यात येत असून अशा विद्यार्थी/संशोधकांना ग्रंथ, संदर्भग्रंथ, नियतकालिके ग्रंथालयामध्ये बसून संदर्भाकरिता देण्यात येतात.

सर्वसाधारण सभासद

सर्वसाधारण सभासद याकरिता रु. २५०/- वार्षिक वर्गणी तसेच रु. २५०/- अनामत रक्कम भरून सभासदांना एकावेळी एक ग्रंथ देण्याची व्यवस्था केली आहे. (संदर्भग्रंथ मात्र ग्रंथालयामध्येच संदर्भाकरिता दिले जातील.)

सभासदत्व :

सभासदत्व :

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असून या तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्र हे माहिती तंत्रज्ञानाच्या जवळचे क्षेत्र असल्यामुळे जास्तीत जास्त प्रगत माहिती-तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात होत आहे. परिणामी ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्राची प्रगतीही तितक्याच प्रचंड वेगाने होत आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्र हे उपयोजकापुढे आज प्रगत माहिती तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान आहे. संगणक तंत्रज्ञान, माहिती प्रसारण/दळणवळण, तंत्रज्ञान तसेच नेटवर्किंग इत्यादीचे प्राथमिक प्रगत ज्ञान आत्मसात करण्याची गरज आज प्रत्येक ग्रंथालय व माहिती केंद्राला आहे. हा दृष्टीकोन समोर ठेवून यशवंतराव चव्हाण ग्रंथालय, व्यवस्थापन व सेवा यावर भर देण्यात प्रयत्नशील आहे.

 

 

     
पुढील पान