|
कार्यवृत्त
कार्यवृत्त
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना ग्रंथालयसेवा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. ग्रंथालये ही उपभोक्त्याला हवी असलेली माहिती मिळविण्यास मदत करतात. ग्रंथालयीन सेवांचा उपभोक्त्याला जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग व्हावा, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकीकरण करण्यात आले आणि OPAC ची सुविधा उपभोक्त्यास सुरू करण्यात आली आहे. ग्रंथालयातील OPAC मुळे उपभोक्त्याला हवा असणारा ग्रंथ ग्रंथालयात आहे की नाही हे शोधण्यास मदत होते. OPAC म्हणजे अशी संगणकीय तालिका की जी उपयोजकाला त्याच्या माहितीचा शोध रिमोट टर्मिनलद्वारा घेता येतो. OPAC ही तालिका सर्व समावेशक शोधासाठी मार्गदर्शन करू शकते. त्यामुळे उपयोजकाला एकापेक्षा अनेक ठिकाणी शोध घेता येतो. कै. यशवंतराव चव्हाणसाहेब ग्रंथप्रेमी म्हणून सर्वांना परिचित होते. त्यांच्या विचारांना अनुसरून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे एक सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयात धर्मकोश, विश्वकोश, विश्वचरित्रकोश, गॅझेटिअर, ऍटलास, इअरबुक, कायदा, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व अर्थशास्त्र इत्यादी विषयांवर महत्त्वाची पुस्तके आहेत. विसाव्या शतकात माहितीची प्रचंड वाढ होऊ लागली. त्यामुळे ‘ग्रंथालय व माहितीशास्त्र’ हे शास्त्र उदयास आले. त्याचबरोबर ग्रंथालयाचे ऐतिहासिक स्वरूप बदलत गेले. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक ठरले. या दृष्टीने ग्रंथालये सर्व बाबतीत समृद्ध होणे समाजाच्या दृष्टीने गरजेची बाब ठरली आहे. ग्रंथालय आता माहिती केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. या विकासामध्ये ग्रंथालय व माहिती केंद्रातील कर्मचारी वर्ग व समाज हे महत्त्वाचे आहेत.
यशवंतराव चव्हाण ग्रंथालय
यशवंतराव चव्हाण ग्रंथालय
|