|
रिसर्च फाऊडेशन ऑफ कॉमर्स इन इंडिया
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ या संस्थेची स्थापना १९५७ मध्ये सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कै. धनंजयराव गाडगीळ यांनी केली. संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट महाराष्ट्राचा आर्थिक व औद्योगिक विकास वेगाने व संतुलितपणे होण्यासाठी संशोधनात्मक कार्य करणे हे आहे. महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी इच्छूक असणार्या उद्योजकांना सांख्यिकीय माहिती पुरविणे, योग्य निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची माहिती देणे, चिकित्सक पद्धतीने आकडेवारी पुरविणे, तसेच महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या उद्योगसंधीविषयी माहिती देण्याचे इत्यादी कामे महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळातर्फे केली जातात. संस्थेतर्फे उद्योजकांसाठी परिसंवाद, परिषदा व कार्यशाळा आयोजित केल्या जातात. वाय्.बी.चव्हाण सेंटरच्या इमारतीमध्ये स्थित महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या दोन्ही संस्था परस्पर सहकार्याने काम करतात. |