|
रिसर्च फाऊडेशन ऑफ कॉमर्स इन इंडिया
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची स्थापना १९११ साली मूलतः दी बॉम्बे सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या नावाने झाली. भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर तसेच कालौघात झालेल्या घटनात्मक बदलांमुळे १ मे १९६१ साली दी बॉम्बे सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या नावाने ओळखली जाऊ लागली. सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. राज्याच्या सहकार चळवळीमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आजपर्यंत अनेक मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले. त्यामध्ये श्री. लल्लुभाई सामळदास, श्री. वैकुंठभाई मेहता, श्री. व्ही. डी. ठाकरसी, डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा प्रमुख उद्देश सहकारी तत्व आणि लोकशाही मार्ग अनुसरून समाजाच्या आर्थिक-सामाजिक परिवर्तनाद्वारे ‘सहकारी राष्ट्रकुला’ची निर्मिती प्रोत्साहन व प्रसिद्धी देणे हा आहे
|