यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

 


इंडियन इस्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, महाराष्ट्र शाखा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, महाराष्ट्र शाखा आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात येते. यावर्षी हा समारंभ दिनांक ३१ मार्च रोजी मंत्रालयातील परिषद दालनामध्ये आयोजित करण्यात आला होता.

भारतीय रिझर्व बँकेचे गर्व्हनर मा. डॉ. वाय.व्ही.रेड्डी यावर्षीचे व्याख्याते होते. त्यांनी आपल्या भाषणात भारतीय रिझर्व बँकेची रचना, कार्य व कामकाज यांवर दृष्टीक्षेप टाकला.

समारंभाचे अध्यक्षपद मा. श्री. जॉनी जोसेफ, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी भूषवले. उपस्थितांचे स्वागत मा. श्री. स्वाधीन क्षत्रिय, चिटणीस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन यांनी केले. मा. श्री. शरद काळे, सरचिटणीस, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांनी आभार प्रदर्शन केले.

या व्याख्यानास वरिष्ठ शासकीय अधिकारी, तसेच बँकिंग व वित्त क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मुख्य पान