यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

 

 राज्यस्तरीय पारितोषिक

 शवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांमधील एक भाग म्हणून्न १९९० सालापासून कृषी-औद्योगिक समाजरचना, सामाजिक एकात्मता, ग्रामीण विकास व मराठी साहित्य संस्कृती या क्षेत्रात भरीव कार्य करणार्‍या व्यक्ती वा संस्थेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. हे पारितोषिक चव्हाणसाहेबांच्या पुण्यतिथीदिन (२५ नोव्हेंबर) देण्यात येते. एक लाख रुपये व न्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा, आमदार-खासदार, विद्यापीठे, महानगरपालिका आणि काही प्रमुख संस्थांशी पत्रव्यवहार करून नामांकने मागविली जातात. या नामांकनांतून योग्य व्यक्तींची निवड होते.

यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य, संस्कृती/कला-क्रीडा राज्‍यस्‍तरीय पारितोषिक २००९ श्रीमती किशोरी आमोणकर यांना देण्यात येणार.

 

 

मुख्य पान