यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

राष्ट्रीय पुरस्कार

मा.यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय एकात्मता, लोकशाहीमूल्ये, सामाजिक-आर्थिक विकास या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणार्‍या व्यक्तीला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. दोन लाख रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुयोग्य व्यक्तीची ‍न‍िवड करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश  श्री. वाय्‌.व्ही.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, डॉ. अनिल काकोडकर, अध्यक्ष, परमाणु ऊर्जा आयोग, डॉ. रघुनाथ माशेलकर, महानिदेशक, वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद, डॉ. अरुण निगवेकर, अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग, डॉ. रुपा शाह, कुलगुरु, एस्.एन्.डी.टी. विद्यापीठ, श्री. चार्ल्स कोरिया, प्रख्यात वास्तुविशारद व राष्ट्रीय नागरी आयोगाचे भूतपूर्व अध्यक्ष हे या समितीचे इतर सदस्य आहेत 

दरवर्षी १२ मार्च रोजी मा. चव्हाणसाहेबांच्या जयंतीदिनी हा पुरस्कार दिला जातो.

 

मुख्य पान