सन्माननीय मान्यवर
|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
श्रीमती. महाश्वेतादेवी
श्रीमती. महाश्वेतादेवी यांचे मानपत्र
मा. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता,
लोकशाहीमूल्ये,
सामाजिक-आर्थिक विकास या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य
करणा-या नामवंत व्यक्तीला
'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय
पुरस्कार व सन्मानपत्र'
देण्यात येते.
रक्कम रुपये
५
लाख व सन्मानपत्र असे या
पुरस्काराचे स्वरुप आहे.
सुयोग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी मा. न्यायमूर्ती (निवृत्त) श्रीमती
सुजाता मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे.
या समितीमध्ये (१)
मा. श्री. चार्ल्स कुरिआ,
प्रख्यात आर्किटेक्ट व राष्ट्रीय नागरी आयोगाचे भूतपूर्व अध्यक्ष, (२)
मा. डॉ. आरमायटी देसाई,
माजी अध्यक्ष,
विद्यापीठ अनुदान आयोग, (३)
मा. डॉ. रघुनाथ माशेलकर,
माजी महानिदेशक वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद, (४)
मा. डॉ. रुपा शहा,
माजी कुलगुरु,
एस.एन.डी.टी. विद्यापीठ
(५)
मा. डॉ. राजन् एम. वेळुकर,
कुलगुरु,
मुंबई विद्यापीठ,
(६)
मा. डॉ. नरेंद्र जाधव,
सदस्य,
योजना आयोग याचा समावेश आहे.
या निवड समितीच्या शिफारशीनुसार मा. चव्हाणसाहेबांच्या पुण्यतिथी दिनी दि. २५ नोव्हेंबर २०१० मध्ये जाहीर करण्यात आलेला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार श्रीमती महाश्वेता देवी यांच्या प्रतिनिधी देवश्री मुखर्जी यांना मा. चव्हाणसाहेबांच्या ९८ व्या जयंतीदिनी दिनांक १२ मार्च २०११ रोजी मा. श्री. शरदराव पवार, केंद्रीय कृषीमंत्री व प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या हस्ते तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्त व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक देण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन विश्वस्त सौ. सुप्रिया सुळे यांनी केले. रोख रक्कम रुपये ५ लाख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. -x-x-x-x-x- |