रंगस्वर

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई


 

डॉ अशोक रानडे सांस्कृतिक विभागाचे संचालक असताना त्यांनी कलाविभाग चालू केला आणि त्याला रंगस्वर हे नाव देण्यात आले.

रंगस्वरमध्ये शास्त्रीय गायन, मराठी नाटके, वाद्य-वादन, काव्यवाचन, नृत्यविष्काराचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच प्रतिष्ठानची निर्मिती असलेले चित्रपट आणि इतरही चित्रपट दाखविले जातात. सर्व भाषिक कार्यक्रमांचा समावेश रंगस्वरमध्ये केला जातो. सौंदर्य, भव्यता, दिमाखदारपणा हे या कार्यकमांचे वैशिष्ट्य असते.

पुणे विद्यापीठ, भीमसेन जोशी अध्यासन, ललित कला केंद्र, पुणे आणि रंगस्वर यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याला एक शास्त्रीय कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमातून उदयोन्मुख कलाकारांना रंगस्वरतर्फे व्यासपीठ मिळते.

सांस्कृतिक विभागासाठी श्री. शरद काळे, डॉ. रविंद्र बापट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येते. रंगस्वरमध्ये कार्यक्रम करण्याची इच्छा असणार्‍यानी त्याबाबतचे अर्ज इतर माहितीसहित प्रतिष्ठानला पाठवावेत.

प्रतिष्ठानच्या रंगस्वरतर्फे नाटय, चित्रपट, गायन आदि कार्यक्रम होतात. रंगस्वरची वार्षिक वर्गणी पती पत्नीसाठी रु. २०००/-, वैयक्तिक रु. १२००/-, अपंगासाठी रु. ५००/- भरुन रंगस्वरचे सभासद होता येते. रंगस्वरच्या सदस्यांना तसेच प्रतिष्ठानच्या आजीव सदस्यांनाही कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो. सांस्कृतिक विभागासाठी सरचिटणीस श्री. शरद काळे, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र बापट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते. श्री. विजय देसाई, व्यवस्थापक, सभागृह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असतात.

जानेवारी २०११ मध्ये 'यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुंबई येथील सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगस्वरच्या वतीने नियमितपणे सादर केले जातात. सर्व सभासद व रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश दिला जातो.
श्री. विजय देसाई व सहकारी त्याचे नियोजन व आयोजन करतात. रंगस्वरसाठी सभासद नोंदणी सुरु आहे.

-x-x-x-x-x-

   

सांस्कृतिक कार्यक्रम

मुख्य पान