सांस्कृतिक कार्य

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई


 

शवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांचा सांस्कृतिक विभागातर्फे वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

दर महिन्याला शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यासारखे कार्यक्रम, तसेच देश-विदेशचे चित्रपटही चव्हाण केंद्रामध्ये दाखविले जातात. नाट्यरसिकांसाठी व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांचे सादरीकरण होते. दीपावलीनिमित्त दीपावली पहाट हे सांस्कृतिक विभागाचे खास वैशिष्ट्य. कला क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व शालेय विद्यार्था यांना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणजे सृजन. हा अभिनव उपक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या विकासाकरीता राबविला जातो. महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या जीवनावर आधारित अनुबोधपटांची निर्मितीही प्रतिष्ठानतर्फे केली जाते.

 

मुख्य पान