|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
पार्थो घोष यांचे व्याख्यान : पार्थो घोष यांचे व्याख्यान : मंगळवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी नवमहाराष्ट्र युवा अभियान आणि औरंगाबाद विभागीय केंद्र यांच्या वतीने ‘जागतिक मंदी – परिमाण व परिणाम’ या विषयावर टाटा ग्रुपचे आर्थिक सल्लागार डॉ. अजित रानडे यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या २४व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून औरंगाबाद येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी जागतिक मंदीविषयी विचार मांडले. या प्रसंगी श्री. नंदकिशोर कागलीवाल, श्री. नीलेश राऊत, श्री. विजय कान्हेकर, श्री. सुहास तेंडुलकर यांची विशेष उपस्थिती होती. या परिसंवादाला आर्थिक तज्ज्ञ आणि अभ्यासकांनी गर्दी केली होती. ‘जागतिक मंदी- परिमाण व परिणाम’ – परिसंवाद : ‘जागतिक मंदी- परिमाण व परिणाम’ – परिसंवाद : दिनांक २८ ऑक्टोबर २००८ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे औरंगाबाद विभागीय केंद्र आणि नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्यातर्फे ‘जागतिकीकरणाच्या युगामध्ये भारताचे स्थान’ या विषयावर श्री. पार्थो घोष यांचे व्याख्याने आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळ यांच्या समवेत या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. पार्थो घोष हे बोस्टन येथील विद्यापीठात प्राध्यापक आहेत. कार्यक्रमांतर्गत त्यांनी स्वावलंबी तत्त्वावर भारतातील छोट्या-छोट्या प्रदेशांना व खेड्यांना समाविष्ट करून भारताचा विकास कसा करता येईल आणि जागतिक स्तरावर अजून प्रगती कशी करता येईल, याचे स्पष्टीकरण केले. या कार्यक्रमाला छोट्या-मोठ्या उद्योजकांची व महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळाच्या अधिकार्यांची उपस्थिती होती.
कार्यवृत्त
कार्यवृत्त
विभागीय केंद्र, औरंगाबाद
विभागीय केंद्र, औरंगाबाद
|