|
ग्रंथालय व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम ग्रंथालय व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
विभागीय केंद्र, कराड
विभागीय केंद्र, कराड
दिनांक २० नोव्हेंबर २००८ रोजी कै. यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी कार्यक्रम आढावा बैठक सौ. वेणुताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टमध्ये झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. रा.गो.प्रभुणे होते. बैठकीला श्री. विद्याधर गोखले, श्री. लालासाहेब पाटील कवठेकर, श्री. अरूण पाटील, श्री. दिलीप पाटील, प्रा. कालेकर, प्रा. सौ. शोभना रैनाक, प्रा. निर्मला घोरपडे, प्रतिष्ठानचे सचिव श्री. मोहन डकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत चव्हाणसाहेबांचे विचार, आठवणी, कार्य पुढच्या पिढीला समजावेत, साहेबांचे विचार ग्रामीण परिसरात जावेत, समाजातील सर्व घटकांना त्यांचा लाभ व्हावा, युवकांना मोठ्या प्रमाणात संघटित करून विधायक कार्याला त्यांनी वाहून पुण्यतिथी कार्यक्रम आढावा बैठक पुण्यतिथी कार्यक्रम आढावा बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कराड विभागीय केंद्राद्वारा संचालित व शिवाजी विद्यापीठ अंतर्गत ‘ग्रंथालय व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ वर्गाचा निकाल ९८% लागला. या परिक्षेत सौ. सुनिता मोरे व कु. तृप्ती चव्हाण (७१.८५%), कु. वैशाली भिसे (७०.८५%) व कु. पवित्रा नलावडे (६९%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. कराड विभागीय केंद्राची ही ११वी बॅच असून या परीक्षेस कराड केंद्रातून ३५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, तर १७ विद्यार्थी द्वितीय श्रेणात पास झाले. या अभ्यासक्रम वर्गास प्रतिष्ठानचे अध्याक्ष श्री. राम प्रधान, आ. बाळासाहेब पाटील, श्री. विलास पाटील-वाठारकर, कार्याध्यक्ष श्री. पी.बी.पाटील, सचिव श्री. मोहन डकरे यांचे विशेष बहुमोल मार्गदर्शन लाभले. अभ्यासक्रम वर्गाचे प्रकल्प अधिकारी म्हणून श्री. अनिल पाटील यांनी काम पाहिले. सर्व विद्यार्थ्यांना प्रा. बाळकृष्ण पालेकर, प्रा. श्रीधर कुलकर्णी, प्रा. ए.ए.पवार, प्रा. अशोक आदमणे, प्रा. सौ. अबोली उमरणी, प्रा. अनिल पाटील यांनी अध्यपनाचे काम केले.
|