|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
विभागीय केंद्र, लातूर
विभागीय केंद्र, लातूर
दिनांक ३० ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा आयोजित
करण्यात आला होता. जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात या
ज्येष्ठ नागरिकाच्या आनंद मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्त
सुभेदार मेजर दामोदर गुंठे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ
समाजवादी नेते व विभागीय केंद्राचे सदस्य ऍड. मनोहर गोमारे,
प्रा. डॉ. नागोराव कुंभार, ज्येष्ठ पत्रकार शरद कारखानीस आदी
उपस्थित होते. यावेळी कृषीभूषण मडोळप्पा उटगे, समाजसेवक
तुकाराम जाधव, कवयित्री इंदूमती सावंत व नारी प्रबोधन मंचच्या
अध्यक्षा इंदूमती जगताप यांचा खा. जनार्दन वाघमारे यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील आदिवासी विभाग असलेल्या श्रीक्षेत्र माहूर
ता. माहूर जि. नांदेड येथे लातूर विभागीय केंद्र व बळीराम
पाटील मिशन मांडवी संचलित रेणुकादेवी महाविद्यालय यांच्या
संयुक्त विद्यमाने दिनांक ४ ऑक्टोबर रोजी
‘शेतकर्यांच्या
आत्महत्याः शोध व बोध’
या ज्वलंत विषयावर डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे व्याख्यान
आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल
यांनी आधुनिक बी-बीयाणे, रासायनिक खते हे आपल्या शेतीला कसे
अपायकारक आहेत व नैसर्गिक सेंद्रीय शेती व माणसाची निसर्गाशी
दोस्ती कशी दुरावत आहे हे सांगून नैसर्गिकरित्याच जीवन जगणे हे
अगदी पुरातन पुराव्यानिशी त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून
उपस्थितींना सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी विभागीय
केंद्राचे सदस्य प्राचार्य व्ही.एन. इंगोले यांचा महाराष्ट्र
शासन पुरस्कृत आदर्श महाविद्यालयीन शिक्षक पुरस्कार
मिळाल्याबद्दल केंद्राच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
दिनांक २ ऑक्टोबर २००८ रोजी पीपल्स कॉलेज, नांदेड येथे महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान कै. लालबहादूर शास्त्री यांची जयंती लातूर विभागीय केंद्राच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पीपल्स कॉलेजचे प्राचार्य व या विभागीय केंद्राचे सदस्य प्राचार्य डॉ. व्ही.एन. इंगोले हे होते, तर प्रमुख पाहुणे माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधवराव किनाळकर होते. या कार्यक्रमाच्या आधी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावरील मुला-मुलींना सादर केलेले चित्रप्रदर्शन उपस्थितांना दाखविण्यात आले.
|