यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

 



नागपूर विभागीय केंद्र
नागपूर विभागीय केंद्र

 

कार्यवृत्त
कार्यवृत्त

साहित्यिक कार्यक्रम :

साहित्यिक कार्यक्रम :

         दिनांक ३ ऑक्टोबर, २००८ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नागपूर विभागीय केंद्राच्या वतीने ज्येष्ठ कवयित्री सौ. आशा पांडे यांच्या अर्चना या भक्ती काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. कुमार शास्त्री म्हणाले की, भक्तीकाव्यातून जीवनाच्या गंतव्य ज्ञानदीप लावण्याचे कार्य सौ. आशा पांडे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. गिरीश गांधी होते.

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श.नू.पठाण यांच्या टाकीचे घाव या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर चर्चा आणि प्रकट मुलाखत असा कार्यक्रम नागपूर विभागीय केंद्र आणि मराठी स्नातकोत्तर विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व समीक्षक डॉ. वि.स.जोग होते. प्रारंभी नागपूरचे पोलीस आयुक्त श्री. प्रवीण दीक्षित यांच्या शुभहस्ते डॉ. श.नू.पठाण यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. हेमंत खडके, डॉ. संध्या अमृते, वंदना फरसोले आणि श्री. गिरीश गांधी या मान्यवरांनी टाकीचे घाव या पुस्तकावर सांगोपांग चर्चा केली.

          दिनांक १० ऑक्टोबर रोजी नागपूर विभागीय केंद्राच्या वतीने ज्येष्ठ कवयित्री डॉ. सौ. सुलभा हेर्लेकर यांच्या दूर दिव्यांच्या सायंकाळी हा काव्य अभिवाचनाचा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची निर्मिती प्रतिष्ठानचे श्री. गिरीश गांधी यांची तर संकल्पना डॉ. प्रज्ञा आपटे यांची होती. डॉ. शुभा साठे व प्रकाश देवा यांनी अभिवाचन केले.

      दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे आयोजित जागतिक परिषदेत उत्कृष्ट पेपर पुरस्कारासाठी प्रसिद्ध कथालेखिका-कवयित्री प्रा. शुभांगी रथकंठीवार यांच्या शोध निबंधाची निवड झाली. यासाठी नागपूर विभागीय केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार श्री. दत्ता मेघे, श्री. गिरीश गांधी, कवयित्री सुमती वानखेडे उपस्थित होते.