यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

 

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे नाशिक विभागीय केंद्र व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त  विद्यमाने रंगभूमादिन पूर्वसंध्या मंगळवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता कुसुमाग्रज स्मारक, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाली. वसंत कानेटकरांच्या नाटकांमधील विविध नाट्यप्रवेश

रंगभूमी दि्न पूर्वसंध्या

रंगभूमी दि्न पूर्वसंध्या

आल्या बरसत धारा

आल्या बरसत धारा

मेघगर्जनांसह पडणारा पाऊस, मातीच्या सुगंधातून दरवळणारा पाऊस, शाळकरी तरूणीला व गृहिणीला दिसलेला पाऊस, इतकेच नव्हे तर पावसाच्या अनेकविध रंगळत पाहून नाशिकवर रसिक मुग्ध झाले. राज्याच्या मुख्य सचिव, कवयित्री व संगीतकार नीला सत्यनारायण यांच्या कल्पनेतून साकारलेल्या आल्या बरसत धारा या कार्यक्रमाने रसिकांनी दाद मिळविली. शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर, २००८ रोजी कालिदास कलामंदिरात झालेल्या कार्यक्रमावेळी खुद्द पावसानेच हजेरी लावल्याने रसिकांना अधिकच आनंदाची अनुभूती मिळाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छगन भुजबळ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. वाळवंटात हिरवेगार वातावरण आणि त्यावर बरसणार्‍या पाऊसधारांचा अनुभव जसा सुखद असेल, तसाच अनुभव आपण राजकरणातून बाजूला जाऊन पाऊस गाणी ऐकताना येत असल्याचे त्यांनी निवेदकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी नीला सत्यनारायण यांनी ही गीते आपल्या आयुष्याचा ठेवा असल्याचे सांगितले. अनेक गीतांवर नृत्यांगाना राजश्री शिर्के यांनी बसविलेल्या नृत्यांनी नाशिककरांना मोहिनी घातली. गाणी, नृत्य मध्येच गप्पागोष्टी असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. प्रख्यात नाट्यदिग्दर्शक भालचंद्र पेंढारकर यांच्या कन्या गिरिजा काटदरे यांनी नृत्यविषयाची व कार्यक्रमाचे निराळेपण सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संपदा जोगळेकर आणि दीपक वेळणकर यांनी केले, तर गीते स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, त्यागराज खाडिलकर यांनी गायली. या कार्यक्रमास आ. प्रतापदादा सोनावणे, महसूल आयुक्त डॉ. संजय चहांदे, जिल्हाधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

 


कार्यवृत्त
कार्यवृत्त

व‍िभागीय केंद्र, नाशिक
व‍िभागीय केंद्र, नाशिक