|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
दिनांक २८ ऑक्टोबर, २००८ रोजी हा कार्यक्रम सारसबागेत झाला. या प्रसंगी श्री. बाबासाहेब पुरंदरे व खा. सुरेश कलमाडी तसेच आ. रमेश बागवे, आदी उपस्थित होते. राष्ट्रकुल युवक क्रीडा स्पर्धेच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते खा. सुरेश कलमाडी यांचा सत्कार करण्यात आला. विशेष बाब म्हणजे यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. त्यात २६ दात्यांनी रक्तदान केले. यास आचार्य आनंद ऋषिजी रक्तपेढीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमांतर्गत वा.दि.वैद्य प्राथमिक शाळेतील २० मुलींचा नृत्यविष्कार, श्री. निलेश देशपांडे यांचे बासरी वादन, स्वरालयच्या गायकांची सुमधुर वाणी यांचा समावेश होता. सालाबादप्रमाणे दिनांक १४ नोव्हेंबर रोजी ‘बालदिना’निमित्त वृद्धांसाठी पर्वती चढणे-उतरणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. श्री. शांतीलाल सुरतवाला यांनी प्रत्यक्ष स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला. एकूण ७८ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ इतिहास संशोधक श्री. निनाद बेडेकर यांच्या हस्ते दिनांक ११ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री. बापूसाहेब खैरे अध्यक्षस्थानी होते. प्रतिष्ठानच्या पुणे केंद्राचे सचिव व म्हाडाचे पुणे विभाग अध्यक्ष श्री. अंकुशराव पर्वती चढणे-उतरणे स्पर्धा पर्वती चढणे-उतरणे स्पर्धा दिवाळी पहाट दिवाळी पहाट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या पुणे विभागीय केंद्राचे कामकाज अध्यक्ष डॉ. राम ताकवले व विश्वस्त श्री. बापूसाहेब खैरे यांच्या मार्गदर्शनाने चालते. सर्व कार्यक्रमाचे प्रत्यक्ष संयोजन माजी महापौर श्री. अंकुशराव काकडे व श्री. शांतीलाल सुरतवाला करतात व श्री. शं.क्रिं.भिडे व प्रा. प्र.त्र्यं.पंडित उपक्रमात सहभागी होतात.
कार्यवृत्त
कार्यवृत्त
पुणे विभागीय केंद्र
पुणे विभागीय केंद्र
|