|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
१९९२ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 39-अ व भारतीय संसदेने पारित केलेल्या विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 ला अभिप्रेत असलेले कायदेविषयक सहाय्य व सल्ला संबंधीचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम नावाच्या विभागाची स्थापना केली. या विभागामार्फत गोरगरीब व सामान्य जनतेला मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला देण्याचे काम चालू आहे. यामध्ये मोफत सल्ला देणे, वादग्रस्तांचे वाद आपसात मिटविणे, लोकन्यायालयांचे आयोजन करणे, विधी संशोधन करून वैधानिक प्रारूप बनविणे आणि विधी साक्षरता करणे इत्यादी कामांचा समावेश आहे. फोरमच्या वतीने सामान्य लोकांसाठी कायदेविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. त्यात कायद्याची ओळख, पौगंडावस्थेतील मुला-मुलींकरिता कायदेविषयक कार्यशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक कार्यशाळा, परिसंवाद, इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. प्रत्येक महिन्याच्या दुसर्या शुक्रवारी फोरमच्या कार्यकर्त्यांची मासिक बैठक ग्रंथालयात आयोजित करण्यात येते. तसेच दर शुक्रवारी सायंकाळी ५ ते ६ कायदेविषयक मोफत सल्ला नामवंत वकिलांद्वारे देण्यात येतो. संपर्क व्यक्ती – श्री. म. बा. पवार, सदस्य सचिव |