|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे महिलांकरीता विकासात्मक प्रशिक्षण, महिला योजनांची माहिती देणारी व्याख्याने, स्वावलंबनाचे धडे, महिला कायदेविषयक साक्षरता कार्यक्रम, कै. वेणूताई चव्हाण जयंतीनिमित्ताने महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कलापथकातर्फे महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाटक तथा गाण्याचे कार्यक्रम केले जातात. तसेच पाणीवाटप, रेशनच्या दुकानातील काळाबाजार इत्यादी सामाजिक समस्यांना वाचा फोडून त्या दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. महिला व्यासपीठाचे कार्य महाराष्ट्रभर चालते. संयोजिका श्रीमती रेखा नार्वेकर व कार्यकारी सयोजिका श्रीमती ममता कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यासपीठाचे कार्यक्रम संपन्न होतात. श्रीमती शोभा लोंढे या प्रमुख कार्यकर्त्या असून महिला स्वयंसेवकांचा सक्रीय सहभाग व्यासपीठास मिळत आहे.
|