|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
समाजकार्यकर्ता प्रशिक्षण अभ्यासवर्ग २०१०-११ महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील महाराष्ट्राचा थोर वैचारिक वारसा त्यांनी पुढे नेला. सामान्य माणसात आत्मविश्वास जागविण्याचे आणि त्यांच्या जागृत संघटित कर्तुत्वातून आधुनिक महाराष्ट्राची पायाउभारणी करण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. त्यांनी दिलेल्या दिशा आणि दृष्टी कैक पिढयांना मार्गदर्शक ठरणाय्रा आहेत. त्यांचे हे विचार जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ची स्थापना करण्यात आली आहे. वरील उदिद्ष्टपूर्तीसाठी प्रतिष्ठानने नवमहाराष्ट्र युवा अभियान या युवा विभागाची उभारणी केली आहे. नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या वतीने समाजकार्यकर्ता प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासवर्ग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे सुरु करण्यात येत आहे. हे वर्ग महिन्याच्या प्रत्येक रविवारी होणार असून, अठरा वर्षावरील तसेच किमान दहावी उत्तीर्ण असणारे कोणीही स्त्री/पुरुष यात सहभागी होऊ शकतात. या कोर्सेसचे उदिद्ष्ट साध्य करण्याकरिता हाताळले जाणारे विषय केवळ वैचारिक अथवा बौध्दिक पातळीवरचे नसून सध्याची समाजस्थिती लक्षात घेता सदर विषयाची योग्य ती सांगड व्यवहारीक विषयांशी घातली जाणार असून केवळ ऐकण्यावर भर दिला जाणार नसून प्रशिक्षणार्थीकडून कार्यपाठ आणि प्रात्यक्षिकाच्या स्वरुपात कृती व त्याच्या प्रत्यक्ष सहभागावर भर दिला जाणार आहे. यासाठी वेगवेगळया क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शनासाठी लाभणार आहेत. या कोर्ससाठी अ.जा/अ.ज/इ.मा.ज/महिला तसेच अपंग प्रशिक्षणार्थींना विशेष सवलत देण्यात येणार आहे. वर्गाची प्रवेशप्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख शनिवार दिनांक १० जुलै २०१० आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क, शमीम खान ९३२३७९३६२९, अर्जुन बचुटे ९८२२१४७१८८,
-x-x-x-x-x-x-
नवमहाराष्ट्र युवा अभियान
नवमहाराष्ट्र युवा अभियान
|