|
यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार (राज्यस्तरीय)
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
पुरस्काराच्या अटी व नियम
अ) पुरस्काराचे स्वरुप - १. पुरस्काराचे नांव “ यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार ” असे राहील. २. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी सामाजिक क्षेत्रात विधायक व परिवर्तनाचे भरीव कार्य करणार्या दोन व्यक्तींची (१ युवक व १ युवती) निवड करून त्यांना प्रत्येकी रु. ११,०००/- (अक्षरी रुपये अकरा हजार)चा धनादेश, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल.
ब) पुरस्कार पात्रता
-
१. पुरस्कारासाठी निवडलेल्या व्यक्तींचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे. (सोबत शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित सत्यप्रत जोडावी.) २. सदर व्यक्तीने स्वत: किंवा त्याच्या संस्थेमार्फत सलग दहा वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी युवा चळवळीच्या वा संघटनेच्या माध्यमातून विधायक तथा परिवर्तनाचे कार्य केलेले असावयास हवे.
क) निवड मंडळ
-
१. या पुरस्कारासाठी प्रतिष्ठानची कार्यकारी समिती ही निवड मंडळ म्हणून काम करील. २. निवड मंडळास एखाद्या वर्षी प्राप्त अर्जातून उमेदवार पुरस्कारयोग्य पात्र वाटले नाहीत तर त्यावर्षीचा पुरस्कार वितरीत होणार नाही. ३. एखाद्या पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तीस पुन्हा पाच वर्षांपर्यंत या पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार नाही. ४. पुरस्काराबाबत निवड समितीचा निर्णय हा अंतिम राहील. तसेच ऐनवेळी बदल करण्याचे अधिकार राखून ठेवीत आहे.
|