यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

 




 

जागर (जागर हा जाणिवांचा; तुझ्या माझ्या लेकीचा)

Untitled 1

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या माध्यमातून
जागर हा जाणिवांचा; तुझ्या माझ्या लेकीचा
उपक्रमास पदयात्रेने प्रारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या विश्वस्त सुप्रिया सुळे यांचा उपक्रम २५ ते २८ ऑगस्ट २०११ या कालावधीत सुरुवात. गेल्या काही वर्षात देशातील व राज्यातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण सातत्याने घटते आहे. स्रीभ्रूण हत्येचे वाढते प्रमाण आगामी काळात भयानक उग्र सामाजिक समस्या निर्माण करतील. यासाठी तातडीने उपाय करायला हवे. समाजाच्या सर्व वर्गात 'मुलगा हवा, मुलगी नको' या हट्टाने संतुलन उध्वस्त होण्याचा धोका संभवतो. एकूणच समाजाची ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. यास्तव "जागर हा जाणिवांचा; तुझ्या माझ्या लेकीचा' हा उपक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे पहिले पाऊल म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या माध्यमातून गुरुवार २५ ऑगस्ट ते रविवार २८ ऑगस्ट २०११ सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा ते गणेश कला, क्रीडा मंदिर, पुणे असे अंदाजे ७० कि. मी. अंतराची पदयात्रा यशवंतराव प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील १८ ते २४ वर्षे वयोगटातील सुमारे ५०० युवती या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. हा संपूर्ण उपक्रम अराजकीय आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
विद्या चव्हाण (9619913993), दत्ता बाळसराफ (9892713049),
विश्वास ठाकूर (9822750033), विजय कान्हेकर (9422175701),
निलेश राऊत (9890542449), वैशाली मोटे (9423072577),
सीमा कल्याणकर (9561519104), डॉ.सचिन जाधव (9870198530), लक्ष्मीकांत खाबिया (9822093366), अमित सामंत (9820043437), श्रीधर पाटील (9321177444), किरण काळे (9028725368),
सुरेश पाटील (9892219583)
Jaagar ( 1 Articles )
Jaagar in News ( 10 Articles )

Up | Down | Top | Bottom

मुख्य पान