यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई


माहिती व  तंत्रज्ञान प्रबोधिनी 

 

येणार्‍या काळात माहिती हेच शस्त्र राहणार आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान हा योजनाकारांपासून पंचायतीपर्यंत परवलीचा शब्द झाला आहे. काळाची पावले ओळखून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने पुण्याच्या सी-डॅक या संस्थेचे अभ्यासक्रम १९९९ पासून सुरू केले. प्रतिष्ठानची माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी ही सी-डॅक, पुणे यांचे संगणक प्रशिक्षणाचे अधिकृत केंद्र आहे. विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादामुळे प्रतिष्ठानच्या माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनीमध्ये संगणकाशी संबंधित विविध अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. प्रबोधिनीतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची निवड नामवंत संस्थांमध्ये होते.  

श्री. सुशील गुप्तन, संचालक व श्रीमती. दीप्ती हेबलेकर, मुख्य विपणन अधिकारी माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनीचे काम कुशलतेने पाहतात.

    मुख्य पान