केंद्रीय कृषिमंत्री मा. श्री. शरद पवार यांची निवडक भाषणे आणि मुलाखती संकलित आणि संपादित केलेल्या फास्ट फॉरवर्ड या इंग्रजी ग्रंथाचे विमोचन पंतप्रधान मा. श्री. मनमोहन सिंग यांच्या हस्ते गुरुवार दिनांक  ७ ऑगस्ट रोजी   ७ रेसकोर्स या पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाले. या ग्रंथाचे संपादन ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत डॉ. अरूण टिकेकर यांनी केले.

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई





फास्ट फॉरवर्ड चे प्रकाशन

 

 

या छोटेखानी शरद पवार यांचे व्यक्तिगत आयुष्य हे विसाव्या शतकातल्या वेगवान बदलांचा आरसा आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणात आणि मुलाखतींमध्ये भविष्यकाळाचा वेध घेण्याचे द्रष्टेपण आहे. देशाच्या ग्रामीण मातीवर घट्ट पाय रोवून आधुनिक भारताचा आणि जागतिकीकरणाचा वेध घेणारे पवार यांचे नेतृत्व अलौकिक आहे, असेसोहळ्यात  गौरवोद्गार पंतप्रधान मा. श्री. मनमोहन सिंग यांनी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हवाई वाहतुक मंत्री प्रफुल पटेल यांनी केले, तर आभार प्रदर्शन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. या सोहळ्याला मा. श्री. पवार यांचे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी, इतर पक्षातील ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रातील मंत्री, स्नेही आणि कुटुंबीय हजर होते.

 

 

पंतप्रधान मा. श्री. मनमोहन सिंग यांच्या हस्ते फास्ट फॉरवर्ड या इंग्रजी ग्रंथाचे विमोचन

मुख्य पान