मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

 

updated on 21-10-2011

ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा - २०११
अहवाल

       महाराष्ट्राचे आधुनिक शिल्प्कार मा. श्री. यशवंतराव चव्हाण यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या सार्वजनिक न्यासाची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या उद्देश पूर्तीसाठी प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळे प्रकल्प व उपक्रम राबविले जातात. तसेच वेगवेगळया कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक व राष्ट्रीय पुरस्कार इत्यादी पुरस्कार दिले जातात. अशाच प्रकारचा एक उपक्रम 1998 पासून सुरु करण्यात आला तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होय. यासाठी दरवर्षी ऑक्टोबरमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा चव्हाण केंद्रामध्ये भरविला जातो. यामध्ये दोन महिला व दोन पुरुष ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, गौरव पत्र देऊन सत्कार करण्यात येतो.

       अशा प्रकारचा पहिला सत्कार दिनांक 11 ऑक्टोबर 1998 रोजी 101 वयाचे पंडित कौशिक यांचा करण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत अशा प्रकारचे 11 आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये अंदाजे 32 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला आहे.

        दरवर्षी अशा मेळाव्याचे आयोजन सुसूत्रपणे करता यावे आणि जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांचा त्यामध्ये सहभाग व्हावा म्हणून मुंबई प्रदेशाचे पुढीलप्रमाणे तीन भाग पाडण्यात आले आहेत.

1.  पहिला विभाग - मुंबई बेट म्हणजेच कुलाबा ते माहिम, शीव - शहर विभाग 2.  दुसरा विभाग  - बांद्रा ते डहाणू - पश्चिम रेल्वे उपनगर विभाग
3.
 तिसरा विभाग - कुर्ला ते कर्जत, कसारा व नवी मुंबई मध्य रेल्वे उपनगर
                 विभाग

वरील पध्दतीनुसार गेल्या वर्षी बांद्रा ते डहाणू या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघांसाठी दिनांक 24 ऑक्टोबर 2010 रोजी चव्हाण केंद्रामध्ये मेळावा भरविण्यात आला होता. त्या मेळाव्यामध्ये खालील दोन महिला व दोन पुरुष ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. n>

   1.   श्री. गोविंद लाडोबा परब, अंधेरी (पूर्व)
   2.   श्री. गोपाळराव तुकाराम कुकडे, दहिसर (पूर्व)
   3.   श्रीमती सुलभा गणेश फळणीकर, विलेपार्ले (पश्चिम)
   4.   कुमारकुमारी निला कौशिक पंडित, बांद्रा (पश्चिम)

      आता चालू वर्षामध्ये आज दिनांक 23 ऑक्टोबर 2011 रोजी कुलाबा ते माहिम व कुलाबा ते सायन या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघांसाठी हा आनंद मेळावा भरविण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये खालील चार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

- x - x - x -