यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

बचत गटातील महिलांसाठी मोबाईल दवाखाना

बचत गटातील महिलांसाठी मोबाईल दवाखाना

यशस्विनी अभियानाच्या कामात अधिक प्रगती होण्यासाठी वेळोवेळी महिलांचे अभ्यास दौरे देशातील विविध भागांत (नामवंत संस्थांमध्ये) आयोजित केले जातात. या अभ्यास दौर्‍यांसाठी तसेच यशस्विनी अभियानाच्या विविध उपक्रमांसाठी आवश्यक असणारे वाहन पवार चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक जाणीवेतून पुणेस्थित शरद मल्हार ट्रस्ट या संस्थेला चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे. बारामती येथे सौ. सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम दिनांक २९ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी इंदापूर, भोर, बारामती येथील बचत गटांच्या महिला व समन्वयिका उपस्थित होत्या. या वाहनामध्ये मोबाईल दवाखान्याचीही सुविधा आहे. या कार्यक्रमाचे आयोजन यशस्विनी अभियानाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वयक श्रीमती वैशाली नागवडे यांनी केले.

या बिग यात्रेत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यात गृहमंत्री आर.आर.पाटील, अर्थमंत्री जयंत पाटील, सौ. सुलक्षणा पाटील, सौ. प्रतिभा पवार, पंकजा मुंढे, पूनम महाजन-राव, महापौर शुभा राऊळ, अभिनेते शम्मी कपूर, सौ. कपूर, आ. सचिनभाऊ अहिर, सौ. शर्मिला ठाकरे, सौ. टिना अंबानी, सौ. रचना कपूर. सौ. कविता विनोद खन्ना, राज कपूर यांच्या कन्या रिमा कपूर जैन, हसिना जेठमलानी, निकिता गरवारे, नतोत्तम सक्सेरिया, पद्मिनी सोमाणी, बिग बझारच्या सी.ई.ओ. आश्मी बियाणी, दोमोधर मल, तेजस्विनी अधिकारी, अनिता पगारे, पराग साने, समीर वांचू, मागरिट लोबो, पत्रकार सुकृत खांडेकर, सौ. वर्षा प्रफुल पटेल, सौ. सुनेत्रा पवार, आ. हेमंत टकले, महिला व बालकल्याण विभागाचे सचिव श्री. विजय सदबीर सिंग, अरूणभाई गुजराथी, अलका कुबल, प्रणती सुशिलकुमार शिंदे यांनीही बिग यात्रेला भेटी दिल्या. सुकन्या कुलकर्णी, कविता लाड, राणी गुणाजी व वैशाली सामंत, राज्याच्या महसूल सचिव (अप्पर) नीला सत्यनारायण, अभिनेते नवीन निश्चल, विजू खोटे, सुकन्या कुलकर्णी, कविता लाड यांनी भेटी दिल्या.

बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या शानदार सोहळ्याचा शुभारंभ सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्री. शाम बेनेगल यांच्या शुभहस्ते लोअर परेल येथील मॉलमध्ये संपन्न झाला. या सोहळ्यासाठी यशस्विनी अभियानाच्या संयोजिका सौ. सुप्रिया सुळे, सौ. बेनेगल, यशस्विनी अभियानाच्या मुख्य समन्वय सौ. सुरेखा ठाकरे, बिग बझारचे श्री. दामोदरन आदी उपस्थित होते.