यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

बिग बझार व यशस्विनी अभियान बिग यात्रा

बिग बझार व यशस्विनी अभियान बिग यात्रा

या यात्रेची अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आखणी करण्यात आली होती. त्यात बचत गटांना उदभवणार्‍या तात्कालिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन सुविधा केंद्राची व्यवस्था चव्हाण सेंटर येथील कंट्रोल रूममध्ये करण्यात आली होती. त्याचबरोबर भरारी पथकाचीही नेमणूक करण्यात आली होती. तसेच प्रत्येक मॉल्सच्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी त्या त्या विभागातील समन्वयकांची नेमणूक करण्यात आली होती.

मुंबई सेंट्रल, लोअर परेल, मालाड एव्हरशाईन मॉल, कांदिवली, तारापूर येथील बिग बझारच्या मॉल्समध्ये महाराष्ट्रातील सुमारे ३५ जिल्ह्यातून २२० बचत गट सहभागी झाले होते. नेमून दिलेल्या प्रत्येक मॉल्समध्ये प्रत्येक तालुक्याच्या पदार्थांना जागा मिळाली होती. यात महाराष्ट्रातील आपल्या भागाची खासियत असलेल्या अस्सल पदार्थांचा समावेश असेल ते या निमित्ताने महत्त्वाचं ठरावं.

याच चळवळीचा पुढचा टप्पा म्हणजे मुंबई येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला दिनांक १५ ते १९ ऑक्टोबर २००८ रोजी संपन्न झालेली बिग यात्रा होय. सिंधुदुर्ग ते गडचिरोली असा व्यापक पट असलेला बचत गटांच्या पदार्थाचा स्वाद मुंबईकरांच्या जिभेवर रेंगाळला. मुंबईसारख्या महानगरात बिग बझारच्या नामांकित ५ मॉल्समध्ये ही खाद्ययात्रा स्थिरावली होती. या निमित्ताने मुंबईसारख्या महानगरात ग्रामीण भागतल्या पदार्थांना हक्काची बाजारपेठ मिळाली.

पुणे, सांगली, कोल्हापूर, ठाणे, कल्याण, औरंगाबाद येथील बिग बझारमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केल्यानंतर महाराष्ट्रातील खवय्यांमध्ये आपल्या खास चवीने बचत गटांच्या या खाद्य पदार्थांनी अनोखं नातं निर्माण केलं आहे. इथल्या खाद्यपदार्थांचा अनुभव गावाकडच्या अस्सलतेची आठवण करून देणारा ठरला आहे.

 


यशस्विनी अभियान
यशस्विनी अभियान