|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
मुख्य सभागृह
यशवंतराव चव्हाण केंद्रातील सभागृहाचा वापर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांसाठी तसेच निरनिराळ्या सामाजिक संस्था, शासनातर्फे आयोजित केलेल्या सभा, संमेलने, चर्चा, परिसंवाद, चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी करण्यात येतो. मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी नाटके, संगीतसभा आदी कार्यक्रमांसाठी सभागृह देणगीतत्वावर देण्यात येते. वातानुकूलन यंत्रणा, आरामदायी खुर्च्या, डॉल्बी डिजिटल साउंड सिस्टीम इत्यादी सुविधांनी मुख्य सभागृह सुसज्ज आहे.
सांस्कृतिक सभागृह व रंगस्वर सभागृह
यशवंतराव चव्हाण केंद्रातील चौथ्या मजल्यावरील सांस्कृतिक सभागृहात देशाच्या व राज्याच्या विकासाशी संबंधित सामाजिक, राजकीय व आर्थिक स्वरूपाच्या परिषदा, परिसंवाद व चर्चासत्रे घेण्यासाठी तसेच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सभागृहे सवलतीच्या दरात देण्यात येतात. |