यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

विषयः युवा धोरण : स्वरूप व आशय

विषयः युवा धोरण : स्वरूप व आशय

महाराष्ट्र राज्य युवा धोरण जाहीरनामा, पुणे विभागीय युवा परिषद

महाराष्ट्र राज्य युवा धोरण जाहीरनामा, पुणे विभागीय युवा परिषद

 

 

अहवाल



 

यावेळी अभियानाचे सहसंयोजक विश्वास ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. अन्वर शेख यांनी अध्यक्षीय समारोप केला. दिवसभराच्या या परिषदेमध्ये विचारमंथन गटाचे सादरीकरण संपन्न झाले. यामध्ये युवा धोरणातील उद्दिष्टे या विषयावर निलेश पुराडकर व भगवान केसभट यांनी, युवांची व्याख्या या विषयावर ऍड. असीम सरोदे, युवांची जबाबदारी या विषयावर प्रा. बी.ए. देशमुख, युवांचे हक्क व कर्तव्य या विषयावर प्राचार्य नितीन घोरपडे यांनी सादरीकरण केले.

या परिषदेचे उद्‍घाटन सिम्बॉयसेस इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या संस्थेचे संचालक डॉ. अरूण मुडबिद्री यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अध्यक्षस्थानी पिम्से चे संचालक डॉ. अन्वर शेख होते. यावेळी बोलताना डॉ.मुडबिद्री म्हणाले की, वर्तमानकाळाला बरोबर घेत येणार्‍या संकटाला सामोरे जाण्याचे बळ युवकांनी आपल्यामध्ये निर्माण करणे गरजेचे आहे, त्यासाठी वास्तवाकडे डोळसपणे बघण्याबरोबर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करणेही गरजेचे आहे.
पुणेः यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभिमानाच्या वतीने महाराष्ट्र राज्य युवा धोरण जाहीरनामा उपक्रम अभियानाच्या निमंत्रक मा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरणाचा जाहीरनामा दि. १२ ऑगस्ट ०९ रोजी मा. मुख्यमंत्र्यांना मुंबई येथे सादर करण्यात येणार आहे. याकरिता या युवा धोरणात महाराष्ट्रातील युवांचा सहभाग असावा, या हेतूने राज्यभरात १२ युवा परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदांमधील पहिली युवा परिषद (विषयः महाराष्ट्र राज्य युवा धोरण : स्वरूप व आशय) पुणे येथे बुधवार, दि.१८ फेब्रुवारी, २००९ रोजी पूना इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्स या संस्थेच्या सहकार्याने संपन्न झाली.